पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते साहित्य वाटप
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
दिव्यांगांना भारत सरकारच्या ADIP योजने अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मुंबई (एल्मीको) च्या सहकार्याने खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रयत्नांतुन पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोफ़त साहित्य वाटप करण्यात आले.
गटशिक्षण अधिकारी कार्यालय लोहारा येथील सभागृहात दि.२८ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पात्र लाभार्थ्यांना सायकल,व्हील चेअर, कुबडीजोडी,श्रवणयंत्र,सी.पी.चेअर,अंधकाटी,स्मार्ट फोन,स्टीक आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले
यावेळी नायब तहसीलदार सुजाता हंकारे,गट विकास अधिकारी शितल खिंडे,शिवसेना (उबाठा)जिल्हा संघटक दीपक जवळगे,लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)तालुकाध्यक्ष नरदेव कदम,माजी सरपंच नवाज सय्यद,शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख,माजी नगरसेवक श्याम नारायणकर,माजी सभापती विलास भंडारे,काँग्रेस नेते रौफ बागवान,माकणी सरपंच विठ्ठल साठे,मोघा सरपंच सचिन गोरे,उपसरपंच पवन मोरे,पंडित दादा ढोणे,अनिल गोरे,अनिल मोरे,पांडुरंग सुरवसे,प्रेम लांडगे,उपसरपंच गुरुनाथ यादव,सोमनाथ भोंडवे,बालाजी मडोळे,बंकट माळी,कुलदीप बडूरे, शहाजी आळंगे,गहिनीनाथ गिरी उपसरपंच ,समाधान मोरे सर, संदीप पाटील ,श्रीकांत जाधव, मंगेश कदम ,प्रवीण थोरात सरपंच,कुंडलिक सूर्यवंशी, नवनाथ भारती, सुभाष गिराम, राजेंद्र कदम,गोपाळ गोरे,संकेत मुसांडे यांच्यासह दिव्याग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.