
लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये १४ विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले. श्वेता भगत (ज्वालामुखी),प्रज्ञा जाधव (हवा जागा व्याप्ती), अदिती वाघमारे (वस्तूला आकारमान आहे), अंकिता बनसोडे-प्रताप चव्हाण (गरीबाचा शावर), अनुष्का भगत (विद्युत बल), सृष्टी राठोड (पाण्याची घनता), शुभ्रा भगत (पाण्याची घनता), प्रतीक जाधव (इथेनॉल), सिद्धी जाधव (अंधश्रद्धा), शुभम राठोड,अमित चव्हाण,संदीप चव्हाण,विजयसिंह राठोड (हवेला वस्तुमान आकारमान आहे). इत्यादी विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारची विविध प्रयोग सादरीकरण केले.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख मोहन शेवाळे यांनी केली व प्रमुख पाहुणे म्हणून लिंबराज बनकर उपस्थित होते. यासाठी मल्लिकार्जुनकलशेट्टी सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी,अनंत कानेगावकर,सुनंदा निर्मले यांचे पण सहकार्य लाभले.