केंद्रीय शाळा डाळिंब येथे कला कार्यानुभव प्रदर्शन

केंद्रीय शाळा डाळिंब येथे कला कार्यानुभव प्रदर्शन
येणेगुर /न्यूज सिक्सर
उमरगा कला कार्यानुभव प्रदर्शन डाळिंब येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक कोकळगावे अब्दुल कादर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवी ते सातवी वर्गातील कुमारी समीक्षा अक्कलकोटे, दीक्षा मुगळे,प्रणिता बंडगर ,दिपाली पवार, अल्फिया कुरणे, पल्लवी देवकते, माहेश्वरी हुलगे,गणेश सुरवसे, ऋषिकेश जाधव ,कुमारी शेख, सायली फडताळे, समीना मुल्ला,अक्षरा सुरवसे,सानिका देवकते ,नव्या कुंभार, श्रद्धा हळूरे, शेख अल्फिया, प्रतीक्षा शिवनेचारी, फिजा शेख, समीना मुल्ला या विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, झुंबर, विविध कलर कागदाचे बिल्ले, सोफा सेट, फ्रिज, मनोरे, फुलदाणी ,गुलदस्ता, फुलझाडे, टीपॉय, बुके, मातीचे फळ फळावळ, फळभाज्या इत्यादी वस्तू पदार्थ शाळेत प्रदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना आनंद मिळवण्यात आला अनेक विद्यार्थी मोठे कलाकारांना शोभेल अशा वस्तू तयार केलेल्या होते. व्यवस्थापन समिती व सर्व पदाधिकारी या सर्वांनी यांचे अभिनंदन केले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती सुलक्षणाताई कांबळे यांनी अभिनंदन करून यातूनच महान कलाकार निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली या शाळेत असेच विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन गुणवत्त विद्यार्थी बनतील अशी आशा शालेय समिती व्यवस्थापक अध्यक्ष श्रीमती सुलक्षणाताई ताई कांबळे यांनी विचार व्यक्त केले. व सर्व शिक्षक व शिक्षिका उज्वला बिराजदार, मुकिंदा गवळी, विनोद सूर्यवंशी, हरिचंद्र राठोड व विद्यार्थी व विद्यार्थिनी व सर्व गावातील नागरिक सर्वांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमात आदीची उपस्थिती होती.