वागदरी येथे आनंदाचा शिधा वाटप,लाभार्थी शिधापत्रिका धारकात समाधान

वागदरी येथे आनंदाचा शिधा वाटप,लाभार्थी शिधापत्रिका धारकात समाधान
वागदरी /न्यूज सिक्सर
गुढी पाडवा सणा पासून प्रतिक्षेत असलेल्या वागदरी ता.तुळजापूर येथील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुर्व संधेला शासकीय स्वस्त धान्य दुकानदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आनंदाचा शिधा वाटप केल.
शासनाने गुडी पाडवा सण व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने फक्त १०० रुपयात त्या त्या गावातील संबंधित स्वस्त धान्य दुकाना मार्फत लाभार्थी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधाकिटचे वाटप करण्यात येईल असे जाहीर केले होते.गुडी पाडवा होऊन गेला पण आनंदाचा शिधा मिळालाच नाही. त्यामुळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत तरी आनंदाचा शिधाकिट मिळेल असी प्रतिक्षा जिल्ह्यातील सर्वच लाभार्थी शिधापत्रिका धारकात होती.बोलेतैसा चाले म्हटल्या प्रमाणे शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुर्वसंध्येला सर्व स्वस्त धान्य दुकानात एक तेल पँकीट एक किलो रवा,साखर व चणाडाळ असलेले किट उपलब्ध करून दिले आहे.वागदरी येथील अंत्योदय,एपीएल,बीपीएल असा एकूण २४९ लाभार्थी शिधापत्रिका धारकाना आंनदाचा शिधाकिटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, शालेय शिक्षण व्यवस्थापण समिती वागदरी चे अध्यक्ष रामसिंग परिहार, सामाजिक कार्यकर्ते बाळु पवार,किशोर सुरवसे,चंद्रकांत बिराजदार, दत्ता पाटील सह लाभार्थी उपस्थित होते.