ब्रेकिंगमहाराष्ट्र
भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे तुळजापूर शहरात उद्घाटन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे तुळजापूर शहरात उद्घाटन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथे जनसामान्यांच्या सेवेत सुरू असलेल्या भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय नवीन बसस्थानक येथे नूतनीकरण करण्यात आले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी नागरिकांची सेवा करावी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.