येत्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुळजापूरला लागलेले मोहोळ उठून लावणार – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

येत्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुळजापूरला लागलेले मोहोळ उठून लावणार – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण
काटी येथील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपसरपंच जुबेर शेख कॉंग्रेस पक्षात प्रवेश
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भाऊबीज व दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच जुबेर हारूण शेख यांचा मा.आ मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थित कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
येत्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुळजापूरला लागलेले मोहोळ उठून लावणार यात काही शंका नाही याची जोरदार तयारी चालू केली आहे असे मत शासकीय विश्रामगृह येथे दि.१५ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी माजी आ.मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना सांगीतले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील , माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे,ऋषिकेश मगर , भावी नगरसेक अमोल कुतवळ ,बालाजी बंडगर , सुनिल रोचकरी ,रणजीत इंगळे , आनंद जगताप, भोकरे , विलास सरडे, काशिनाथ बंडगर , रामेश्वर तोडकरी ,गौरीशंकर कोडगीरे, अशोक जाधव , सयाजी देशमुख ,सचिन भोजने, चंद्रकांत काटे , अमोल गावडे ,आबा गाढवे , श्रीकात रसाळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते