ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने झाला प्रारंभ! एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना काढण्यात आला.
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने झाला प्रारंभ!
एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना काढण्यात आला.
तुळजापुर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने झाला प्रारंभ देवीचा सिंहगाभाऱ्यात पूर्ण विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती.
तत्पूर्वी रविवारी १० :३० च्या दम्यान रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन नंदी वाहनावरून छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या वाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना काढण्यात आला. त्यावेळी भाविकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत छबीना काढण्यात आला.