श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने झाला प्रारंभ
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने झाला प्रारंभ
देवीचा सिंहगाभाऱ्यात पूर्ण विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आई श्री तुळजाभवानी माता साडेतीन पीठापैकी एक पुर्ण शक्तीपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आई राजा उदो उदो च्या जयघोषात घटस्थापना करण्यात येऊन दि.१५ ऑटोंबर रोजी आई तुळजाईचा मंचकी निद्राकाल संपन्न होऊन देविचा सिंहगावाबारा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होता रविवारी पहाटे श्री तुळजाभवानीच्यामूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.सकाळच्या नित्योपचार अभिषेक पूजेनंतर दुपारी ठीक १२ वा. देविच्या सिंहगाबाऱ्यात घटस्थापना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा श्री व सौ.जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली घट कलशांची पारंपारिक पध्दतीने पुजा करुन गोमुख तीर्थापासून या घट कलशांची मिरवणूक काढण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात तसेच खंडोबा मंदिर, यमाईदेवी मंदिर, टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.योगेश खरमाटे,व्यवस्थापक तथा तहसिलदार सोमनाथ माळी , धार्मिक साय्यकव्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, पिआर ओ गणेश मोठे,महंत तुकोजबुवा, मंहत वाकोजी बुवा, महंत चिलोंजीबुवा पाळीचा पुजारी डॉ. अक्षय पाटील सर्व पुजारी बांधव आदी उपस्थित होते .घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्स प्रारंभ झाला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटिल, उप विभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, भोपे पुजारी मंडळ, पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
,तहसिलदार अरविंद बोळंगे, सौ.अर्चनाताई पाटिल, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश देशमुख,बंडोपंत पाठकसह अनेक मंदीर कर्मचारी पोलीस प्रशासन उपस्थित होते.
हा शारदीय नवरात्र महोत्सव या महिन्यात भाविकांची संख्या मोठ्या संख्येणे असते त्यामुळे या पुजारीवृदं देवीजीस सिंहासन महाअभिषेक पुजा करतात कुल कुलाचार मंदिरात करतात तसेच शारदीय नवरात्रउत्सव ९ दिवस उपवास करतात या शारदीय नवरात्र उत्सव काळात सर्व धार्मिक विधी महापूजा भाविकांना करता येणार भाविकांना मोफत दर्शन पास सुविधा केली आहे.
देविच्या सिंहगाबाऱ्यात घटस्थापना करण्यात आली या घटस्थापनेसाठी वावरी मध्ये सात प्रकारचे धान्य असे यात जज्वारी, गहू, हरभरा, जवस, सातू, करडी, जोड या धान्याचा मान अनेक वर्षा पासून शेटे परिवाराकडे आहे.