न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

भुसणीत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

Post - गणेश खबोले

मुरूम,(प्रा सुधीर पंचगल्ले) :

भुसणी, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील दहावी वर्गात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी बनल्या एक दिवसाच्या शिक्षीका. प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ बुधवारी (ता. १५) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्यापूरता अनुभव नव्हता, भविष्याला आकार देणारा, कला गुण सादरीकरणाचे एक प्रतिक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवशीय अनुभव व आनंद वाढविणारा असतो. स्वयंशासनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती व्हावी यासाठी असे उपक्रम राबविले जातात. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. शाळेतील विविध वर्गातील अद्यापनासाठी इयत्ता १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चित्रकला विषयांसह विद्यार्थ्यांना धडे शिकवण्यात आले. गुणवत्तेच्या आधारावर मुख्याध्यापक गणेश भोसले, उपमुख्याध्यापक प्रिती बिराजदार, पर्यवेक्षीका साक्षी हिरमुखे यांनी स्वयंशासन दिनी शाळेचे कामकाज पाहिले. दुपारच्या सत्रात निरोप समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे होते. सहशिक्षक प्रेमनाथ आपचे, शिवाजी कुंभार उपस्थित होते. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पालकवर्ग यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता ९ वी वर्गाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रमुख अतिथीचा सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला भेट वस्तु देण्यात आली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक शिंदे म्हणाले की, विद्यार्थी हे उद्याचे भविष्य निर्माण करणारे आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिंद्र गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रिती पाटील तर आभार साक्षी पातले यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे