
लोहारा / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ ,संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद विभागात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षेततर कर्मचारी संघटनेचे लोहारा शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे एक दिवशीय संप पुकारला.यात शिक्षकेतर कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, संयुक्त कृती समिती तसेच औरंगाबाद शासकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे ,सातवा वेतन आयोगानुसार १०,२०,३० लागू करणे,५८ महिन्याची थकबाकी अदा करणे ,जुनी पेन्शन योजना लागू करणे,१४१० पदाला सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्यासाठी दिनांक १५/०२/२०२३ रोजी बैठक झाली परंतु लेखी न मिळाल्यामुळे आज दिनांक १६ /०२/२०२३ रोजी लोहारा शहरातील शिक्षणाचे केंद्र असलेले शंकराव जावळे पाटील महाविद्यालयात लोहारा च्या समोर एक दिवशीय लक्षणीक संप पुकारण्यात आला.अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस डॉ.शिरीष देशमुख यांनी माहिती दिली यावेळी श्री प्रवीण पाटील हे शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष तसेच बालाजी सगर, नंदकिशोर माने,परमेश्वर कदम,प्रकाश राठोड आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.