
लोहारा-प्रतिनिधी
पवित्र रमजान सनानिमित्त लोहारा शहरातील ईरम अब्बास शेख ने (रोजा) उपवास पकडला आहे.
मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान सण सुरू झाले असून या पवित्र रमजान निमित्त मुस्लिम समाज बांधव रोजा उपवास धरतात.
ऐन उन्हाळ्यात पवित्र रमजान निमित्त उपवास रोजे सुरु झाले असून उन्हाच्या तीव्रतेने लाही लाही होत आहे.
अशा उन्हाच्या तिव्रतेत देखील मुस्लिम समाज बांधव उपवास रोजी धरतात. यामध्ये लहान बालकांचा देखील उपवास रोजे धरण्यामध्ये समावेश असतो.
लोहारा येथील पत्रकार अब्बास शेख यांची आठ वर्षाची मुलगी ईरम अब्बास शेख ने एक दिवसाचा रोजा पूर्ण केला.
एका दिवसाचे कटाक्ष उपवास पूर्ण केले असल्याने पालकासह शहरातून कौतुक केले जात आहे.
—————– ——————
उपवास निमित्त कुटुंब करते चिमुकल्यांना खुश !
लहान चिमुकले रोजा उपवास केल्यास नवीन कपडे फुलांचा हार असे मनसोक्त लहान चिमुकल्यांना नवनवीन खरेदी करून त्यांना खुश केले जाते यामुळे बालकांचा मनोबल वाढले जाते.