शि.भ.प. कुमार सागर स्वामी यांना आंतरराष्ट्रीय शिवकथाकार व स्वरगंधर्व पुरस्कार प्रदान
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील गुरुवर्य,स्वरसाम्राट,शि.भ.प.कुमारसागर स्वामी महाराज यांना आंतरराष्ट्रीय शिवकथाकार व स्वरगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
औसा जि.लातूर येथे हिरेमठ संस्थान च्या प्रति वर्षाप्रमाने आयोजित 84 वा वार्षिक महोत्सव निमित्त ष,ब्र,108 शतायुषी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज,ष,ब्र.108 सद्गुरु डॉ.शांतिवीरलिंग शिवाचार्य महाराज,बालतपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज,सुभाष अप्पा मुक्तता, विजयकुमार मिटकरी, नागेश अप्पा येळेकर यांच्या उपस्थितीत श्री श्री 1008 जगद्गुरु सिद्धलिंगराज देशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन पीठ यांच्या हस्ते शि.भ.प.स्वरसम्राट कुमारसागर स्वामी महाराज लोहारेकर यांना आंतरराष्ट्रीय शिवकथाकार व स्वरगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांच्या आई शोभा स्वामी आणि महोत्सवासाठी उपस्थित भक्तगण,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.