
लोहारा(प्रतिनिधी)
शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा येथे मराठी विभाग वतीने प्राचार्य शेषेराव जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २८ जानेवारी २०२५ कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ वाचन संकल्प, वकृत्व स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात आले. यानंतर प्रा.विद्यासागर गिरी यांचे व्याख्यान आयोजन कऱण्यात आले. आजचा विद्यार्थी मोबाईलचा अती वापर करीत आहे. वाचना पासून दूर जात आहे.आताच सावध होणे गरजेचे आहे. आपल्या मराठी भाषेत अप्रतिम साहित्य आहे त्याचे आपण वाचन करावे. असे अवाहन केले. आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी वाचन चळवळ राबविणे काळाची गरज आहे. माय मराठीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याचा मराठी माणसाला अभिमान बाळगला पाहिजे. ती अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रामहरी सुर्यवंशी हे होते. त्यांनी मराठी भाषा विकासासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा आणि रोजगार या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. प्रभाकर गायकवाड, डॉ छाया कडेकर, डॉ.पार्वती माने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दत्ता कोटरंगे यांनी केले तर सूत्र संचालन वैभव घोडके यांनी केले आणि आभार पार्थ बनसोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी आणि तीनही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.