
तुळजापूर (प्रतिनिधी)
बाभळगाव ता. तुळजापूर येथील साठवण तलावावरील पुलाखालीपाण्यावर तरंगताना तिघांचे मृतदेह आढळले असून यामध्ये दोन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे. ही घटना सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्ग ६५ वर दि. २७ रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलीसाकडून मिळालेली माहिती आशी की दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर केरुर गावाजवळील बाभळगाव तलावातील पुलाखाली पाण्यावर तरंगताना तिघांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये अयुब नदाफ (वय ४५) रा.आनंद नगर मुरूम ता.उमरगा व महिला जया लक्ष्मण कांबळे (वय ३०),रेश्मा होडगी (वय ३२) असे महिलांचे नावे
आहेत.अद्याप घटनेचे कारण स्पष्ट झालेले नसून दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आसल्यची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.स्थानिक
लोकांच्या मदतीने पोलीसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून टोल नाक्याच्या ऑब्युलस मध्ये नळदुर्ग येथील दवाखान्यात पाठविण्यात आले.दोन दिवसा पूर्वी हे तिघे गावातून मोटरसायकलवर गेल्याचे नातेवाईकांनी
सांगितले.सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन दहा वर्षे झाले.परंतु हे अद्याप अर्धवट आहे. विविध ठिकाणच्या फुलांचे काम अर्धवट राहिले आहेत.
बाभळगाव तलावरील याच पुलावर तीन महिन्यापूर्वी एक एस.टी बस याच कठड्यावरून खाली पाण्यात जाता जाता बचावली होती यामध्ये ५० प्रवाशी होते. परंतु पुन्हा त्याच ठिकाणी ही घटना घडली असून पुलाला कटडा नसल्यामुळे ही घटना घडल्याचे वर्तवली जात
आहे.या घटनेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून रस्त्याचे काम आणखी किती जणांचा बळी घेतल्यानंतर पूर्ण होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.