एकता तरुण गणेश मंडळ अध्यक्ष पदी जाधव तर उपाध्यक्षपदी चव्हाण
एकता तरुण गणेश मंडळ अध्यक्ष पदी जाधव तर उपाध्यक्षपदी चव्हाण

एकता तरुण गणेश मंडळ अध्यक्ष पदी जाधव तर उपाध्यक्षपदी चव्हाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे एकता तरुण गणेश मंडळाची बैठक मंडळाचे आधारस्तंभ तथा माजी सरपंच सुहास उंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष पदी वैभव जाधव तर उपाध्यक्ष पदी प्रशांत चव्हाण व खजिनदार पदी राहुल उंडे तसेच मिरवणूक प्रमुख म्हणून समाधान देशमुख, अनिल उंडे, शरद पवार यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व सदस्य उपस्तिथ होते.
अध्यक्ष वैभव जाधव बोलताना म्हणाले की वृक्षरोपण तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील तसेच त्यांनी बोलताना असेही सांगितले की गावातील मुख्य रस्त्याचे सुशोभिकरण करून गावात काही समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार
सुहास उंडे बोलताना म्हणालेकी की सर्व कार्यक्रम पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार करण्यात यावे व आपला सण शांततेत पार पडावा.