ब्रेकिंगमहाराष्ट्र
प्रभाग 12 मध्ये घाणीचे साम्राज्य; नगर परिषदेत कचरा फेकून केले आंदोलन

प्रभाग 12 मध्ये घाणीचे साम्राज्य; नगर परिषदेत कचरा फेकून केले आंदोलन
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील कचराकुंड्यांची स्वच्छता वारंवार कळवूनही केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रणवीर इंगळे यांनी शुक्रवारी (दि.11) नगर परिषदेसमोर कचरा फेकून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना याबाबत दिनांक 31 जुलै व 8 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले होते प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकुण 11 ठिकाणी कचराकुंड्या आहेत. तेथे वेळोवेळी कचरा उचलून स्वच्छता करण्यात येत नाही. तसेच याबाबत यापूर्वीही अनेकदा लेखी कळवून, आंदोलन करूनही दखल घेतली जात नही. नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षकांकडे विचारणा केल्यास ते उर्मट उत्तरे देतात. त्यामुळे नगर परिषदेच्या उर्मट कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे नगर परिषद कार्यालयासमोरच कचर्याचा ढीग साचला होता. त्यामुळे नगर परिषदेत कामकाजासाठी आलेले नागरिक आणि कर्मचार्यांची मोठी तारांबळ उडाली.