मराठा समाजाला तत्काळ सरसकट पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्यावे – मराठा वनवास यात्रा
मराठा समाजाला तत्काळ सरसकट पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्यावे - मराठा वनवास यात्रा

मराठा समाजाला तत्काळ सरसकट पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्यावे – मराठा वनवास यात्रा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा समाजाला तत्काळ सरसकट पन्नास टक्केच्या आत ओबीसी आरक्षण देण्याचा कॅबिनेटने ठराव पास करून अध्यादेश काढावा कोणत्याही पक्षातील नेत्याने या मागणीला विरोध करू नये. अन्यथा 2024 मध्ये येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मराठे प्रस्थापित पक्षांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करेल असा इशारा निवेदनाद्वारे मराठा वनवास यात्रा समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन देवून दिल्याची माहिती योगेश केदार यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पन्नास टक्केच्या आत मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मराठा समाजालाही मिळावे यासाठीची मागणी करणारी ही वनवास यात्रा आहे. आपल्या सरकार ने काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक समिती नेमली. हे एक सकारात्मक पाऊल आहे. असे आम्हीही मानतो. परंतु आजपर्यंतच्या समित्यांनी किती काम केले? याबाबत महाराष्ट्राला संशय आहे.
त्यामुळे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात कायदा पारित करण्यात यावा. कोणत्याही पक्षातील नेत्याने या मागणीला विरोध करू नये. अन्यथा मध्ये येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मराठे प्रस्थापित पक्षांवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहे असे निवेदनात म्हटले आहे.