ब्रेकिंगमहाराष्ट्र
किलबिल किड्स इंग्लिश स्कूल, लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल यांची चौकशी सुरू

किलबिल किड्स इंग्लिश स्कूल, लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल यांची चौकशी सुरू
उस्मानाबाद /न्यूज सिक्सर
धाराशिव शहरातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शालेय साहित्य चढ्या दराने मोठ्या प्रमाणावर विक्री करत असलेल्या शाळेवर कडक कारवाई करावी तसेच अशा शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याकडे केली होती, तसेच किलबिल किड्स इंग्लिश स्कूल,लिटल फ्लावर इंग्लिश स्कूल येथे जाऊन पुस्तके,वह्या गणवेश विक्री करत असलेल्या व्हिडिओ शिक्षण विभागात पुराव्यानिशी दाखवून दिला आहे याची दखल घेत शिक्षण अधिकारी प्राथमिक,सुधा साळुंखे मॅडम यांनी या शाळेची चौकशी सुरू केली आहे आता या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्यात येती का?हे पहावे लागेल..