मागासवर्ग आयोगाचे सदस्यांची घेतली आढावा बैठक प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र 15 जुलै पर्यंत निकाली काढा

मागासवर्ग आयोगाचे सदस्यांची घेतली आढावा बैठक
प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र 15 जुलै पर्यंत निकाली काढा
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
शासकीय विश्रामगृह येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि जिल्हा जात पडताळणी समितीच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना तात्काळ जात प्रमाणपत्राचे वाटप करण्याचे निर्देश दिले. डॉ.काळे म्हणाले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेत 15 जुलै पर्यंत सर्व प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात यावे. तसेच जिल्हयातील वस्तीगृह निवासी आश्रम शाळांना सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच मागासवर्गीयांसाठी सुरु असलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाटे, लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक संचालक दिलीप राठोड ,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबादचे उपायुक्त बलभीम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक बाबसाहेब अरवत तसेच समाज कल्याण निरीक्षक युवराज भोसले, युवराज चव्हाण, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे कर्मचारी, यांची उपस्थिती होती.