न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अन्न व औषध विभागाची कारवाई किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा व तंबाखु जप्त

अन्न व औषध विभागाची कारवाई
किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा व तंबाखु जप्त

 

उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांना प्राप्त माहितीच्या आधारे आज दि.07 जून 2023 रोजी उस्मानाबाद शहरातील मे.सफा किराणा व जनरल स्टोअर्स , विजय चौक, दर्गा रोड,  उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद या पेढीची तपासणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न.त.मुजावर यांनी केली असता त्यामध्ये विविध प्रतिबंधित अन्न पदार्थाचा (हिरवा गोवा 1000, बादशाह गुटखा, विमल पान मसाला, माणिकचंद पान मसाला, आरएमडी पान मसाला, आरएमडी सुगंधित तंबाखू, राजनिवास पान मसाला, चंदन सुगंधित सुपारी , राजू इलायची, रत्ना ३०० तंबाखु, रॉयल 220 सुगंधित तंबाखू, XL जाफरानी जर्दा, एम सेंटेड टोबॅको) एकूण किंमत रु 40 हजार 903/- किमतीचा साठा आढळून आला. जप्त साठ्यामधून प्रत्येकी 1 असा एकूण 15 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. किराणा मालाबरोबर प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करत असल्यामुळे मा.आयुक्तांच्या आदेशानुसार पेढी सील करण्यात आलेली आहे. हजरव्यक्ती/पेढीमालक
श्री.उमर फारुख खलील शेख यांच्याविरुद्ध भादवि कलम १८८, २७२, २७३, ३२८ नुसार शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद येथे फिर्याद दाखल करण्यात आले असून एफआयआरक्र. २०२/२०२३ असा आहे.

सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न.त.मुजावर यांच्या पथकातील श्री.तावरे, श्री.काझी, श्री.अकोसकर यांनी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री.शि.बा.कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे