8 व 9 जून रोजी वेतन पडताळणी पथकाचा उस्मानाबाद दौरा

8 व 9 जून रोजी वेतन पडताळणी
पथकाचा उस्मानाबाद दौरा
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
सातव्या वेतन आयोगप्रमाणे वेतन पडताळणी पथक दि.8 व 9 जून रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून जानेवारी 2019 नंतर सेवानिवृत्त झालेले आणि डिसेंबर 2030 पर्यंत सेवा निवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी तसेच तसेच न्यायालयीन,मयत,लोकायुक्त प्रकरणांची पडताळणी पथकाकडून प्राधान्याने पडताळणी करण्यात येणार आहे.
सेवापुस्तक शासन निर्णय परीपत्रक वित्त विभाग,दि.20 जानेवारी 2001 प्रमाणे परीपूर्ण पूर्तता करून जोडपत्र सेवापुस्तकात जोडणे आवश्यक आहे. सेवापुस्तके पडताळणीसाठी दाखल करताना शा.नि.वि.वि.दिनांक 14 मे 2019 नुसार वेतनिका प्रणालीमार्फत वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी सादर करावयाचे आहे.सेवा जेष्ठतेनुसार मिळालेली प्रत्यक्ष पदोन्नती नाकारली असल्यास तसेच कालबद्य,आप्रयोच्या लाभा दिलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी यानंतर प्रत्यक्ष दिलेली पदोन्नती नाकारली असल्यास त्याबाबतची नोंद त्याच्या मुळ सेवापुस्तकात घेणे आवश्यक आहे. वेतनपडताळणी पथकासाठी आपल्या जिल्हयातील दौरा कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी केले आहे.