जी 20 शिखर परिषद विद्यार्थ्याना मार्गदर्शक – डॉ. श्रीधर सामंत

जी 20 शिखर परिषद विद्यार्थ्याना मार्गदर्शक – डॉ. श्रीधर सामंत
तुळजापूर /न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर येथे विद्यार्थ्यासाठी हवामानातील बदलासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज या विषयावर जी 20 शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उदघाटन डॉ. श्रीधर सामंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश चादरे हे उपस्थित होते. या परिषदेमध्ये टाटा सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्यानी जी 20 मध्ये सहभागी असलेल्या देशांची पर्यावरण विषयक मांडणी केली यामध्ये 1) भारत – आश्रय यादव २) ब्राझील – शुभम घोष 3) यूके- प्रणव शर्मा ४) जर्मनी- आदित्य कुमार 5) USA – लक्ष्य राजपूत ६) तुर्किये- अनन्या पांडे 7) दक्षिण आफ्रिका – तिथी शुक्ला 8) सौदी अरेबिया- मोही गुप्ता
9) ऑस्ट्रेलिया – लिथिका
10) जपान- अपर्णा बॅस्टिन
11) चीन – गुलशन यादव
12) दक्षिण कोरिया- उदय बनसोड 13) कॅनडा- देबलेना सरकार 14) फ्रान्स- शुभम कपिसवे 15) इटली- अरुणिमा मानसिंग 16) मेक्सिको- हर्षवर्धन तांबे 17) अर्जेंटिना- वैष्णवी सिंग 18) रशिया- आरुषी साहा 19) इंडोनेशिया- क्षितिज मार्कम 20) EU- श्रीहर्ष या विद्यार्थ्यानी वीस देशांचे प्रतिनिधीत्व करत आप आपल्या देशातील पर्यावरण विषयक पुर्व स्थिती, सद्य स्थिती व भविष्य कालीन नियोजन या बाबत सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ. श्रीधर सामंत म्हणाले की, या परिषेदेच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर जी 20 च्या वीस देशांची सद्य स्थिती व भविष्य कालीन नियोजन बाबत मिळालेली माहिती विद्यार्थ्याना मार्गदर्शक ठरत आहे. येणाऱ्या काळामध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून सलोनी कुमारी व गौरव यांनी काम पाहिले. या कार्यक्रमामध्ये 70 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.