ब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्ह्यात मानसीक आजार असलेल्या महिला व मुली साठी व्यवस्था करणे बाबत

जिल्ह्यात मानसीक आजार असलेल्या महिला व मुली साठी व्यवस्था करणे बाबत
उसमानाबाद /न्यूज सिक्सर
जिल्ह्यात मानसीक आजार असलेल्या बेवारस महिला व मुली फिरत असताना आपण पहातो . या मानसीक आजाराच्या सुरुवातीच्या स्थितीत असतात पण समाजात मानसीक आजारा बाबत माहिती व ज्ञानाची जागृती नसल्याने आशा महिलांना वेळीच मदत केली जात नाही त्यामुळे आशा महिला रस्त्यावर बेवारस अनेक रात्र फिरत काढीत असतात . त्यांच्यावर अनेक अनिष्ठ प्रसंग तसेच लैंगीक अत्याचार होत असतात पण त्यांची मानसिक स्थिती इतकी खालावलेली असते की त्या कोणाकडे तक्रार ही करू शकत नाहीत . अशावेळी त्यांची जबाबदारी उपलब्द असलेले महिला आश्रम ही घेत नाहीत हे वास्तव आहे .
वरील वस्तुस्थिती विचारात घेता या बाबी कडे लक्ष वेधण्यासाठी मानव अधिकार व सामाजिक न्यायशिष्ट मंडळाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा करण्यात आली . या प्रकरणी मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे साहेब यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सकारात्मकतेने प्रतिसाद देत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांना आदेशीत करून समितीची बैठक तात्काळ बोलावण्या यावी . यामध्ये मुख्याधिकारी नगरपालिका , जिल्हा पोलिस अधीक्षक उस्मानाबाद यांना व मानवाधिकार व सामाजिक न्यायशिष्ट मंडळ यांचा समावेश करावा . असे ही आदेशीत केले .
या शिष्टमंडळाचे नेतृत्व मानवाधिकार व न्याय शिष्ट मंडळाचे अध्यक्ष अँड. जिनत प्रधान यांनी केले . यावेळी बाबासाहेब जानराव , सुवर्णा कांबळे , रघुनाथ गायकवाड , विजय गायकवाड हे पदाधिकारी उपस्थित होते .