वसुदेव कुटुम्बकम् हा विश्वाला शांतता व एकात्मता देणारा विचार-आनंद भालेराव

वसुदेव कुटुम्बकम् हा विश्वाला शांतता व एकात्मता देणारा विचार-आनंद भालेराव
तुळजापूर /न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व नरेंद्र आर्य महाविद्यालय, आपसिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने जी 20 अंतर्गत येथे ‘वसुदेव कुटुम्बकम् व पर्यावरणातील बदल,समस्या व उपाय या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन श्री जयराज सुर्यवंशी, प्राचार्य,नरेंद्र आर्य महाविद्यालय, डॉ. श्रीधर सामंत, आनंद भालेराव, प्रमुख व्याख्याते, शंकर ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते, शाकी कोपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आनंद भालेराव म्हणाले की, जी 20 अध्यक्षपद व वसुदेव कुटुम्बकम् हा विश्वाला शांतता व एकात्मता देणारा सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कृतीप्रधान विचार आहे. जी 20 चा उद्धेश, सहभागी देश व त्या त्या देशांची आर्थिक स्थिरता, पर्यावरण बदलांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाय योजना यांची माहिती विद्यार्थ्याना व्हावी या अनुषंगाने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने घेतलेला कार्यक्रम अत्यंत महत्वपुर्ण आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्याना सर्वसमावेशक माहिती व ज्ञान देणे ही महत्वाची भुमिका व जबाबदारी टीस पार पाडत आहे. आनंद भालेराव पुढे बोलताना म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण 2020 व जी 20 कार्यकारी गट अंतर्गत कौशल्य आधारीत शिक्षणावर शैक्षणिक संस्था विद्यापीठानी व विद्यार्थ्यानी नावीन्यपूर्ण व कृती आधारीत उपक्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले. या प्रसंगी, डॉ. श्रीधर सामंत म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग देण्याची गरज असल्याचे सांगितले. या प्रसंगी, श्री.जयराज सुर्यवंशी म्हणाले की, टाटा सामाजिक संस्थेचे उपक्रम हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना प्रेरणा व दिशादर्शक असतात यातून विद्यार्थ्याना नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्यास मिळतात. त्या अनुषंगाने घेण्यात आलेला जी 20, शाश्वत विकासाचे गोल व पर्यावरणातील बदलांचा परिमाण या विषयावर घेण्यात आलेला चित्रकला स्पर्धा सारखे उपक्रम मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. श्री. शंकर ठाकरे यांनी पर्यावरणातील बदलांचा परिमाण या विषयाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा या विषयावर मार्गदर्शन केले व नियमावली सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रकाश मगर यांनी केले. आभार प्रा.श्री चंद्रकांत सोनटक्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व 125 विद्यार्थ्यानी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.गणेश चादरे, आनंद भालेराव, शंकर ठाकरे, सखी पोकरे यांनी अथक परिश्रम घेतले.