अवैध जनावराची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अवैध जनावराची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
बेंबळी/न्यूज सिक्सर
बेंबळी पोलीस ठाण्याचे पथक दि. 25.06.2023 रोजी 15.40 वा.सु. पो.ठा. हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान उमरेगव्हाण रोडने जात असताना विठ्ठलवाडी पाटीजवळ 15.40 वा. सु. विठ्ठलवाडी पाटीजवळ एक पिकअप टेम्पो क्र. एम.एच. 45 टी 4289 येत असताना पथकास दिसल्याने पथकाने त्यास थांबण्यास सागिंतले. पथकाने संशयावरून चालकास विचारपुस केली असता त्याने आपले नाव- असिफ मुबारक सय्यद, वय 23 वर्षे रा. बोरखेडा, ता. उस्मानाबाद असे सागिंतले.पथकाने टेम्पोत काय आहे असे विचारले असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पथकाने संशयावरून टेम्पोचे पाठीमागे हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय जनावरे दिसून आली. यावर पोलीसांनी नमूद टेम्पो चालक- असिफ सय्यद यास त्या जनावराची वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 4,25,000 ₹ किंमतीच्या नमूद टेम्पोसह त्यातील अंदाजे 1,25,000 ₹ किंमतीचे सुमारे 6जनावरे ज्यात 2 जर्शी गाय, दोन गायची वासरे, एक बैल, एक म्हशीची वगार असे गोवंशीय जनावरे अतिशय निदर्यपणे दाटीवाटीने कोंबुन अवैध्यरित्या कत्तल करण्यासाठी घेवून जात असताना पथकास मिळून आला. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- शंकर भारती यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(अ), 9 सह कलम 11(घ)(ड),(च) प्राण्यांना क्रुरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- श्री. शिंदे, बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.