ब्रेकिंगमहाराष्ट्र
धाराशिव जिल्ह्यात विज्ञान केंद्र सुरु करा देवकते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

धाराशिव जिल्ह्यात विज्ञान केंद्र सुरु करा
देवकते यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
धाराशिव /न्यूज सिक्सर
ब्रम्हांडातील गृह व तार्यांचा अभ्यास करता यावा व हजारो वर्षा पूर्वीचे धर्मग्रंथ व अध्यात्म याची सांगड घालता यावी यासाठी धाराशिव जिल्ह्यात विज्ञान केंद्र सुरु करावे , या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१६ ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते यांनी निवेदन दिले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, हिंदू धर्मातील वेद, जुने धर्मग्रंथ यामध्ये हजारो वर्षांपासून विज्ञानवादी लिखाण आहे. नवग्रह , ज्योतिषशास्त्र, सुश्रुत यांची शल्य चिकित्सा, धन्वंतरीची आयुर्वेद उपचार पध्दती, या संदर्भात हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी विविध धर्मग्रंथात लिखान केले आहे. हे सप्तऋषी म्हणजे आजचे शास्त्रज्ञ होय. आजच्या विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हिंदू धर्माचे अध्ययन झाले पाहिजे . विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घातली पाहिजे . यामुळे ब्रम्हांडातील गृह व तार्यांचा अभ्यास करता यावा यासाठी धाराशिव जिल्ह्यात विज्ञान केंद्र चालु करावे अशी मागणी जिल्हा उपाधक्ष श्री . देवकते यांनी केली आहे .