नृत्य कलाकारांनी मिळवली लोहारेकरांची दाद… रजत वर्ष महाशिवरात्री यात्रा उत्सव
Post-गणेश खबोले

लोहारा (प्रतिनिधी)
दिलखेचक लावण्या,युगल,सामुहिक वैयक्तिक नृत्याना लोहारेकरानी भरभरून दाद दिली.लोहारा शहराचे ग्राम दैवत शंभो महादेव रौप्य महोत्सवी महाशिवरात्री यात्रा निमित्त २६ फेब्रुवारी ते २ मार्च या पाच दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात मानाच्या काठी व पालखी ची शोभा यात्रा,लक्की ड्रॉ,रांगोळी,बुद्धिबळ, मरोथॉन,कुस्ती,राज्यस्तरीय नृत्य,कीर्तन,भारुड,काल्याचे कीर्तन, दीपोत्सव आदी स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन लोहारा येथे करण्यात आले होते.
पाच दिवस चाललेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शहरात गजबज निर्माण झाली होती.शेवटच्या दिवशी भव्य राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सातारा, सांगली,बीड,सोलापूर,लातूर,उमरगा अंबाजोगाई ठिकाणा हुन स्पर्धक आले होते.घुंगरांचा छनछनाट करीत लावणी,मंगळागौर,ज्योतिबाच्या नावानं चांगभलं,देवीचा जागर,लोकगीत,आदिवासी नृत्य,आशा अनेक गीता वर नृत्य सादर करीत लोहारेकराची दाद स्पर्धकांनी मिळवली,
स्पर्धेचे उद्घाटन लोहारा येथील मान्यवरांच्या हस्ते महादेवाचे पुजन आणि द्वीप प्रजवलन करून करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष वैशाली खराडे, प्रभारी पोलिस निरीक्षक डी.बी.कुकलारे,मा.सरपंच शंकर अण्णा जट्टे,नगरसेवक अविनाश माळी, विजयकुमार ढगे,शिवसेना नेते अभिमान खराडे,मा पस सदस्य दिपक रोडगे,केडी पाटील,शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे,शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार,भाजपाचे विक्रांत संगशेट्टी, बाबा सुंबेंकर,डॉ.चंद्रशेखर हंगरगे,डॉ. आम्लेश्वेर गारठे,डॉ.बाबासाहेब भुजबळ,हॉटेल व्यावसायिक चेतन बोडगे, उद्योजक सिद्धेश्वर वैरागकर,भागवत बनकर,राजेंद्र फावडे, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष प्रमोद बंगले,कोब्रा सामाजिक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष दत्ता निर्मळे,ओम कोरे,नितीन नारायणकर,मंगेश गोरे,गौरीशंकर कलशेट्टी,शिवम स्वामी यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.नृत्य स्पर्धेला परीक्षक म्हणून सुरेश वाघमोडे,निलेश, शुभम यांनी काम पाहिले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ढगे आणि भिमाशंकर डोकडे यांनी तर प्रास्तविक विठ्ठल वचने-पाटील यांनी केले.यादरम्यान अभिमान खराडे आणि गोपाळ सुतार यांनी महाशिवरात्री यात्रे बद्दल मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सदस्य श्रीनिवास माळी, तमा स्वामी,ओम पाटील,हरी लोखंडे,शैलेश जट्टे,सचिन माळी,ईश्वर बिराजदार,किरण पाटील,सुनील देशमाने,कमलाकर मुळे, महेश कुंभार, आपु स्वामी,अमित बोराळे,वैजीनाथ माणिकशेट्टी,जितेश फुलकुरते,गगन माळवदकर,राजपाल वाघमारे,रामेश्वर वैरागकर,शिवकुमार बिराजदार,व्यंकट चिकटे,महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
नृत्य स्पर्धेतील विजेते.
सामुहिक लहान गट
प्रथम जी बी ग्रुप.(लातूर),द्वितीय औसम ग्रुप(लातूर),तृतीय: के के ग्रुप (लातूर)बी.एम के.(माढा),
सामुहिक मोठा गट
प्रथम राजमुद्रा (उमरगा),द्वितीय भवानीशंकर (तुळजापूर) आणि आर डी.एस सावंतवाडी (गोवा),तृतीय डी डी एस (पंढरपूर),कलाविश्व (लातूर)
वैयक्तीक लहान गट
प्रथम आस्था डांगे(अंबाजोगाई),द्वितीय शौर्या गोडबोले (लातूर),तृतीय जान्वी कसबे(लातूर),समृद्धी तिपणे(सोलापूर)
वैयक्तिक मोठा गट
प्रथम अनामिका आहिरे(बीड),द्वितीय पायल पाटील(सांगली),कुष्ठी जाधव (सातारा)तृतीय सानिका भागवत(सातारा),करण लांडगे(लातुर)
युगल गट
प्रथम सुमित आणि आरती(सातारा),द्वितीय पुष्कर आणि विशाद (नाशिक),तृतीय अनामिका आणि अंकिता (बीड)