पोलिस स्टेशनजवळील अगदी हाकेच्या अंतरावरील असलेल्या मोबाईल दुकानात २८ लाखाची चोरी

पोलिस स्टेशनजवळील अगदी हाकेच्या अंतरावरील असलेल्या मोबाईल दुकानात २८ लाखाची चोरी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पोलिस स्टेशनजवळील अगदी हाकेच्या अंतरावरील असलेल्या मोबाईल दुकानात २८ लाखाची चोरी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील उस्मानाबाद रोड साळुंके कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकानात चोरट्याने शटर उचकटून प्रवेश करन जवळपास २८ लाख किमंतीचे विविध किंमतीचे मोबाईल संच चोरून नेले. दरम्यान चोरट्याने दुकानाच्या शटर लोखंडी कटावणीने उचकटून विविध कंपन्यांचे जवळपास २८ लाख रूपये किमंतीचे अनेक मोबाईल संच चोरून नेले. हि घटना दि.१९ मार्च रोजी मध्य रात्री मध्ये चोरी झाली दि.२० मार्च रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती तुळजापूर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या संबधीची फिर्याद सचिन शिंदे यांनी दिली.दुकानात सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसी टीव्ही मध्ये फोरव्हिलर आल्याली दिसत आहे त्यातील काही युवक गाडीच्या खाली उतरूण शर्टर कटावणीने उचकटन आत प्रवेश करताना दिसत आहे अशी माहिती मोबाईल दुकानचे मालक सचिन शिंदे यांनी दै. एकमतशी बोलताना सांगितले. त्यामुळे परिसरातील सीसी टीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू आहे.