कृष्णा रोचकरी भाजपकडून नगराध्यक्षपदाचे दावेदर आगामी निवडणूक लढविणार – कृष्णा रोचकरी यांचे आव्हाण

कृष्णा रोचकरी भाजपकडून नगराध्यक्षपदाचे दावेदर आगामी निवडणूक लढविणार – कृष्णा रोचकरी यांचे आव्हाण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे पुजारी देवानंद रोचकरी यांचे चिरंजीव युवा नेते नगराध्यक्ष पदाचे दावेदार देवराज मित्र मंळाचे अध्यक्षा कृष्णा देवानंद रोचकरी आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडूनच नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणार अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी रविवार दि.१९ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगीतल.यावेळी नगराध्यक्ष पदाचेदावेदार कृष्णा रोचकरी, अम्रवाडीचे सरपंच गणेश रोचकरी, सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ टोले, बाळासाहेब भोसले, अविनाश रसाळ, युवा नेते विशाल बाळासाहेब रोचकरी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.रोचकरी यांनी पुढे बोलताना म्हणाले की पंधरा वर्षांपूर्वी रोचकरी नगराध्यक्ष पद आमच्या कडे असताना शहराच्या विकासासाठी शासनाकडे सहाशे कोटीचे मागणी केली होती पण शासनाने ३६० कोटी निधी मंजूर केली पण मागील पंधरा वर्षांमध्ये ३६० कोटीचे काय झाले व किती काम झाले हे सर्व शहरातील मतदार यांना माहित आहे अनेक कामे अर्धवट आणि भोसग आहेत. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप तर्फेच निवडणूक लढविणार असून कृष्णा रोचकरी यांना नगराध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी करणार आहोत पक्षश्रेष्ठी आदेशानुसार आपली भूमिका पार पाडू. सध्या सत्ताधाऱ्यांना असे वाटत आहे की शहरात आम्हाला विरोधक नाही पण त्यांचे भ्रम आहे. यावेळेस तुळजापूर शहरात चर्चा चालु आहे शिंदे गटांमध्ये जाणार आहोत असे पत्रकारांनी विचारले असता कृष्णा रोचकरी म्हणाले कुठेही जाणार नाही. भाजपमध्येच राहणार आहे व भाजपच्या कमळ चिन्हावरच कृष्णा रोचकरी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी वरिष्ठ नेत्याकडे मागणी करणार असे म्हणाले.तसेच पुढे बोलताना म्हणाले मंदिर संस्थांचा कारभार हा चुकीचा पद्धतीने चालू असून अभिषेक पास ऑनलाइन बंद करून पहिली पद्धत चालू करावे कारण ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाईन बुकिंगच अधिक प्रमाणात वापर करता येत नाही. कृष्णा रोचकरी यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून सध्या भवानी रोडवर पथदिवे बसविण्याचे काम चालू असून नगर परिषदेमधील होत असलेल्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केला आहे ? याप्रसंगी तालुक्यातील ग्रामीण भागातील देवराज मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.