न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

युवा वर्गाने आयोजित केलेलं मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर प्रचंड उत्साहात संपन्न

युवा वर्गाने आयोजित केलेलं मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर प्रचंड उत्साहात संपन्न

तुळजापूर /न्यूज सिक्सर
पिंपळा खुर्द येथील एकूण ४९३ नागरिकांचा सहभाग..!
त्यातील ८६ रुग्णांना पुढील उपचारासाठी मोफत मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात येणार आहे

नेहमीच सामाजिक कार्यात युवा वर्ग सक्रिय असतो समाजाला एक नवीन दिशा आणि भविष्याच्या आशा दाखवण्याचे कार्य येथील युवा वर्ग करत असतो. जनसेवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्याचे चुणूक दिसून येते. असंच तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या सहकार्याने वर्ष दुसरे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रथमता श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन, फुले व श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर उपस्थित तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सत्कार सरपंच व गावातील सामान्य नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला.
एकूण ४९३ नागरिकांनी तपासणी करून औषधोपचार घेतले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात १९० वयोवृद्धाचा सहभाग दिसून आला.स्त्रीयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला, ज्यांना गंभीर आजार असतील असे ९२ रूग्णांना मुंबई येथे मोफत पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. ज्या वृद्धांना चालता येत नाही,त्यांची घरी जाऊन तपासणी करून उपचार करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून तामलवाडी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक व आमचे आदर्श मा रमेश घुले साहेब यांचा शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला व गावचे सरपंच रुक्मिणी काळे ताई यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम नियोजन आणि आयोजक जनसेवा सामाजिक संस्था व युवा वर्ग टिम शंकर सगर, महेश मस्के, नेताजी डांगे, निशांत मस्के, कृष्णात रोमन, दत्ता काकाजी कदम,प्रतिक कदम, विनोद मस्के,गेनदेव कदम, मंगेश कदम, महादेव कदम, महादेव धनके, प्रविण रोमन नितीन कदम,हरि शिंदे,विराज गिरी,बबलू परिट व इतर मित्र वर्ग उपस्थित होते.
विशेष सहकार्य महादेव मंदिर ट्रस्ट, कृष्णा इव्हेंट – सोमनाथ जाधव व आरोग्य उपकेंद्र आशा कार्यकर्त्यां…
विशेष धन्यवाद दमदार आमदार राणा दादा व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ नवि मुंबई यांचे शतश: धन्यवाद.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे