शशिकांत नर वडे यांचे दैदिप्यमान यश,जिल्हाधिकारी पदी निवड तुळजापूर महसूल प्रशासनाच्या वतीने सत्कार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शशिकांत नरवडे यांचे दैदिप्यमान यश,जिल्हाधिकारी पदी निवड
तुळजापूर महसूल प्रशासनाच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द ) येथील शशिकांत नरवडे हे युपीएससी परीक्षेत देशातून ४९३ रँक मधून जिल्हाधिकारी झाले त्यांचे दि.१२ जून रोजी तहसिलदार चंद्रकात शिंदे महसूल प्रशासनाच्य वतीने पुष्प गुच्छ व देविची प्रतिमा देवून गौरविण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार मोहन पांचाळ, मंडळ अधिकारी अमर गांधले,मंडळ अधिकारी शिंदे ,पेशकार शिंदे ,पेशकार येलगुंडे , तसेच सुरेश वाघमारे, दत्ता नन्नवरे व कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते. दोन वर्षाखाली माझ्या मित्रा सोबत तहसीलदार शिंदे यांना भेटलो हेतो त्यावेळेस त्यांनी मला म्हटले होते प्रयत्न करीत राहणे खाचायचे नाही त्या प्रयत्नाला शंभर टक्के यश मिळणार आणि ते मिळाले. यूपीएससी एमपीएससी परीक्षा देणारे आपले विद्यार्थी असतील तर मला कधीही फोन करा मी त्यांना मार्गदर्शन करेन जिल्हाधिकारी शशिकांत नरवडे यांनी तहसील कार्यालयात सत्कार समारंभ समयी मार्गदर्शन करताना बोलत होते.