
“शासन आपल्या दारी” कार्यक्रमात आमदार खासदार मध्ये विकासा कामावरुन जुगलबंदी.!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
थेथे आयोजित शाषण आपल्या दारी कार्यक्रमात आमदार खासदार मध्ये विकास कामावरुन चांगलीच जुगलबंदी झाली
शनिवार दि१०रोजी येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे तसेच तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्रीधर जाधव , भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन काळे , राष्ट्रवादीचे गोकुळ शिंदे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की तालुक्यातील बारा हजार नागरिकांचे अर्ज आले आहेत या बारा हजार अर्जांची प्रश्न शासकीय अधिकारी मार्गी लावत आहेत.तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता पाणी देण्यासाठी हर घर नळ हे राबविण्यात येत आहे.राज्य सरकारने महिलांसाठी प्रवासाकरता बस मध्ये ५० टक्के सूट दिली आहे.मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या नावावर एक लाख रुपये जमा होणार अशा अनेक योजना केंद्र व राज्याने नागरिकांना दिले आहेत.
तसेच तिर्थक्षेञ लवकरच रेल्वे मार्गावर येणार आहे.व कृष्णा खो-यातील २१टीएम सी पाणी लवकरच मिळणार आहे असे सांगितले
त्यानंतर बोलताना खा ओमराजे निंबाळकर म्हणाले
.शासन आपल्या दारी ही योजना रोज राबवण्याची गरज आहे.अनेक शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा बाबतीत तक्रारी आहेत.प्रत्येक शासकीय कर्मचारी आपण लोकसेवक आहे.असे मानून काम करावे.आपण महिन्याला पगार उचलतो याचे भान ठेवावे शासनाने कर्मचाऱ्यांना प्रमोशन देताना नागरिकांचे ही मते घ्यावीत असे यावेळी म्हणाले
शाषण चांगले काम करते तर रोज आम्हाला का फोन करतात असा सवाल करुन लोकांनी आम्हाला निवडुन दिल्याने त्यांना आम्हाला फोन ध्दारे जाब विचारण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
तुळजापूर चे तात्कालीन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी शेतरस्ता बाबतीत चांगले काम केले सांगितले जाते तर रोज शेतरस्ता तक्रारी माझ्याकडे का येतात यांनीच केलेल्या शेतरस्तावर अतिक्रमण कसे काय होतात याच तालुक्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालाया समोर उपोषणाला का बसावे लागते असा सवाल केला
शाषणाने एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली तसी गँस दरात द्यावी असे म्हणताच उपस्थितीत महिलांनी टाळ्याचा कडकडाट केला.
कृष्णाखो-यातील २१टीएमसी पाण्याला २००८ला कै विलासराव देशमुख यांनी मंजुरी दिली अजुन ही पाणी आले नाही
फेरन अँण्ड लवली रोज महिला लावतात मग किती महिला गोऱ्या झाल्या असा सवाल करुन होणाऱ्या विकास कामांचे सध्या असे झाले आहे.असे सांगुन
जाहिरात करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा काम करा असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हाणला
या कार्यक्रमदरम्यान पंचायत समिती कार्यालय, गटशिक्षण कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, विद्युत मंडळ कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, वन विभाग व सामाजिक वनिकरण कार्यालय, महिला व बालविकास विभाग कार्यालय, तहसील कार्यालय पुरवठा विभाग, तहसील महसूल विभाग, बँकिंग विभाग, आरोग्य विभाग कार्यालय, इत्यादी विभागाचे लाभधारकांना प्रमाणपत्र रेशन कार्ड वितरित करण्यात आले.
यावेळी प्रमाणपत्र तसेच विविध योजनांचे अनुदान चेक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार संतोष पाटील यांनी केले तर प्रभारी तहसिलदार चंद्रकांत शिंदे यांनी मानले
फेरन लवली लावून किती महिला गोऱ्या झाल्याका ? मात्र फेरन लवली लावायचं सोडत नाहीत अशी जाहिरात करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा काम करा असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिला.तात्कालीन तसिलदार सौदागर तांदळे यांचे शेतरस्त्याबाबत काम चांगले म्हणतात मात्र या शेतरस्त्याच्या कामाचे शंभर फोन मला येतात मग चांगलं काम कोन करतय खासदार का तहसिलदार अशा तसिलदारचा नायब तसिलदार करावा चांगलं काम करणाऱ्या नायब तसिलदारचा तहसीलदार करावा.
जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर