मुरूम शहरात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणूक पारंपरिक वाद्यांने वेधले मुरूमकरांचे लक्ष

मुरूम शहरात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणूक
पारंपरिक वाद्यांने वेधले मुरूमकरांचे लक्ष
मुरूम/न्यूज सिक्सर
राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि.३१ मे रोजी मुरूम शहरातील धनगर समाज मंदिरात राजमाता होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्थापणा करण्यात आले होते. या पाच दिवसात लिंबू चमचा,संगीत खुर्ची,भाषण स्पर्धा सह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन जय मल्हार ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. दि.०४ जून वार रविवार रोजी मुरूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक,गांधी चौक,हनुमान चौक मार्गे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे वाजतगाजत, भंडारा चे उधळण करत भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आले. धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य गजढोलच्या तालावरील नृत्यांनी मुरूमकरांचे लक्ष वेधले. मिरवणूकी दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील प्रत्येक चौकात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले तर मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक एम जी शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.