ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्री तुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळतीर्थ व गोमुख तीर्थातील पवित्र जल घेऊन शिवबाराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांचे रायगड कडे प्रस्थान
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिरातील श्रीकल्लोळतीर्थ व गोमुख तीर्थातील पवित्र जल घेऊन शिवबाराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांचे रायगड कडे प्रस्थान
तुळजापूर : प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकसोहळ्यासाठी अकरा वर्षापासून शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी कल्लोळतीर्थ व गोमुख तीर्थातील पवित्र जल व देवींची कवड्याची माळ राज्याभिषेकासाठी घेऊन जातात यावेळी कलश्याचे पुजारी पूजन आप्पासाहेब चोपदार , आनंद साळुंके , राजाभाऊ पवार, यांच्या हस्ते पूजन केले यावेळी उपस्थित अर्जुन साळुंके, नितीन जट्टे, बालाजी जाधव, चेतन साळुंके, मारुती जाधव सह शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.