
तुळजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र तुळजापूर पुण्यवन नगरीत नागरिकांना तुळजापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, सध्या दिवसा घरफोडी चे प्रमाण वाढले आहे त्यामुळे,आपण बाहेरगावी जात असाल तर त्या बाबत चीं माहिती आपले शेजारी तसेच जवळचे नातेवाईक यांना देण्यात यावी तसेच मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, घरामध्ये न ठेवता बँकेमध्ये सुरक्षित ठेवावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने, बरेचसे नागरिक हे आपले घराचे दारे व खिडक्या उघडे ठेवून, झोपतात, तसेच गच्चीवर ही झोपण्याकरिता जातात, तरी सर्वांनी याबाबत खबरदारी घेऊन झोपते वेळेस, घराची दारे खिडकी व्यवस्थित बंद करून, घराबाहेरील लाईट चालू ठेवावी. तसेच कोणी संशयित अथवा अनोळखी इसम दिसल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन तुळजापूर यांना देण्यात यावी.
पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद पोलीस स्टेशन तुळजापूर