बारुळ येथील शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या गळ्याला सावकारकीचा फास ! येत्या काही दिवसात नाविलाजास्तव आमरण उपोषन इशारा – ढवळे

बारुळ येथील शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या गळ्याला सावकारकीचा फास !
येत्या काही दिवसात नाविलाजास्तव आमरण उपोषन इशारा – ढवळे
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील जमीन गट क्रं. ६१५ पैकी क्षेत्र ८५ आर., खाजगी सावकाराने फसवून खरेदीखत करुन घेतल्याबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना दि.१७ मे रोजी रविंद्र बळीराम ढवळे, रा. शिवाजी नगर, हाडको तुळजापूर, यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, ढवळे तुळजापूरचा राहणारा असून, त्यांची स्वसंपादीत जमीन बारुळ,येथील जमीन गट क्रं. ६१५ पैकी क्षेत्र ८५ आर., होती. सन २०२१ जानेवारी महिन्यात ढवळे औषधोपचारासाठी सोलापूर येथील दवाखान्यात अँडमिट होतो. त्याकाळात मला रु ६०,०००/- ची कमतरता भासल्याने मी खाजगी सावकारी करत असलेले राजेंद्र दिगंबर माने व त्याची उमा राजेंद्र माने रा. हाडको तुळजापूर यांच्याकडे रु. ६०,०००/- ची मागणी केली. सदर रक्कम वरील सावकारांनी मला २० % टक्के व्याजदराने कर्ज दिले होते. दवाखान्यात अॅडमिट असल्याने त्यांचे जवळ- जवळ २,६०,०००/- खर्च झाल्याने माझ्या आर्थिक अडचणी वाढल्याने सावकाराचे घेतलेली रक्कम ६०,०००/- रु मुदतीत १ वर्षात परतफेड करु शकलो नाही. त्यामुळे . सावकार राजेंद्र माने यानी जमीन गट नं. ६१५ पैकी क्षेत्र ८५ आर., ही जमीन माझ्याकडे घान ठेव नाही तर लगेच माझे पैसे टाक असे म्हणून मला मानसिक त्रास देऊन पैशासाठी तगादा लावला. त्यावेळेस त्यांनी माझ्यावर दबाव आणून माझी स्वसंपादीत जमीन गहानखत करुन दे असे म्हणून ढवळे यांना फसवुन जमीनीचे खरेदीखत करुन घेतले व त्यामध्ये सदर जमीनीची किंमत ३,५०,००/- रु दाखवून सदर रक्कम पुर्वीच दिल्याचा मजकूर खरेदीखत दस्तामध्ये नमूद केला. वास्तविकता वरील नमूद खाजगी सावकाराने कोणतेही रक्कम दिलेले नाही. याबाबत ढवळे यांनी दि. २२/०७/२०२२ रोजी तक्रारी अर्ज देऊनही आजतागायत कोणतेही चौकशी अथवा कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच ढवळे यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही.
तरी सावकारावर त्वरित कार्यवाही करुन जमीन मला वापस देण्याविषयी कार्यवाही करावी अन्यथा उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने व सदर खरेदीखताधारे सावकार मला वरील माझ्या जमीनीमधून कब्जाहिन करून माझ्यावर उपासमारीची वेळ आणणार असून तशी धमकी सावकाराने दिल्याने तक्रार यापुर्वी दिलेली आहे. तरी अर्जाचा गांभिर्याने विचार करुन जमीन परत देण्यात यावी. अन्यथा मला नाविलाजास्तव आमरण उपोषन करावे लागेल असा लेखी इशारा दिला आहे. या निवेदनावर रविंद्र बळीराम ढवळे यांची स्वाक्षरी आहे.