कुलगुरू स्व. प्रा.डाॅ.दिलीप मालखेडे वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन

कुलगुरू स्व. प्रा.डाॅ.दिलीप मालखेडे वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन
अमरावती /न्यूज सिक्सर
स्थानिक सर्वोदय कॉलनी, काँग्रेस नगर रोड येथील संत रोहिदास महाराज सांस्कृतिक भवनात कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले .
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप मालखेडे यांचे जानेवारी २०२३ ला दुःखद निधन झाले.ते सर्वोदय कॉलनीतील रहिवासी होते. त्यांची स्मृती चिरंतर राहावी तसेच नव्या पिढीने वाचन संस्कृतीचे जतन करून निरंतरपणे वाचन करीत मोठ मोठी हुद्दे पादाक्रांत करावी या उद्देशाने कॉलनी वासियांनी व समाजबांधवांनी’ कुलगुरू स्व.प्रा.डॉ. दिलीप मालखेडे वाचनालय ‘ सुरू केले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
कॉलनीतील रहिवासी श्री.प्रभाकर सावरकर व सौ. सरस्वती सावरकर यांनी एक मोठे पुस्तकासाठी स्टीलचे कपाट वाचनालयास भेट दिले. चिखलदरा येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री सुधाकर पानझडे यांनी दहा हजार रुपये तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्काराने सन्मानित समाजभूषण श्री सुधाकर विरुळकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी वाचनालयास जाहीर केली.प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी दहा हजार रुपयांची पुस्तके तर प्रा.केशव भगवान मालखेडे (बंगलोर)यांनी दहा हजार रुपयांची देणगी वाचनालयास जाहीर केली.
प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी १०० तर श्री भास्कर भटकर यांनी ४० पुस्तके भेट देण्याचा संकल्प
केला. उदघाटन प्रसंगी अनेकांकडून अनेक पुस्तकांची भेट वाचनालयास प्राप्त झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ” ज्यांना कुलगुरू स्व.प्रा.डॉ.दिलीप मालखेडे वाचनालयाला जुनी व नवीन पुस्तके भेट द्यायचे असतील त्यांनी खालील पत्त्यावर पाठवावे अथवा खालील फोन नंबर वर संपर्क साधावा . प्रा. डॉ.संजय खडसे,सर्वोदय कॉलनी , काँग्रेस नगर रोड , अमरावती आणि
श्री सुधाकर नासणे, अध्यक्ष सर्वोदय गृहनिर्माण संस्था , सर्वोदय कॉलनी,काँग्रेस नगर रोड, अमरावती . या पत्त्यावर
पुस्तके पाठवण्याचे व देणगी देण्याचे आवाहन तसेच प्रा.संजय खडसे- 9890790585 व प्रा.अरुण बा.बुंदेले – 808
7748609 ,श्री सुधाकर विरुळकर-9422915806 , प्रा.पी. जी.भामोदे-8552988
916,प्रा.गजानन वानरे -9422
868035,प्रा.डॉ.गजानन डोईफोडे ( अकोला ) – 9922
169526 ,श्री वासुदेव वानखडे -919922411099,श्री भास्कर भटकर-9881330535,
श्री दयाराम तायडे-98603106
10, श्री अनिल भागवतकर -9766495691,श्री पांडुरंगजी खंडारे -9011946161 या नंबरवर वाचनालयाला पुस्तक भेट देण्यासाठी अथवा देणगी देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन वाचनालयाच्या ग्रंथ एकत्रीकरण समितीने एका पत्रकाद्वारे केलेले आहे.