गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांचा फुले-शाहू- आंबेडकर संघटनांच्या वतीने सत्कार संपन्न

गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांचा फुले-शाहू-
आंबेडकर संघटनांच्या वतीने सत्कार संपन्न
अमरावती /न्यूज सिक्सर
भारतातील ख्यातनाम गझलकार पंडित भीमराव पांचाळे यांचा अमरावती नगरीच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य नागरी सत्कार नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी उपेक्षित समाज महासंघ,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,सर्वशाखीय माळी महासंघ,डॉ.आंबेडकर / समाजभूषण संघटना,वऱ्हाड विकास परिवार,फुले – शाहू -आंबेडकरी संघटनांच्या वतीने प्रा. श्रीकृष्णा बनसोड ,प्रा.अरुण बुंदेले,रामकुमार खैरे,वसंतराव भडके,प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेरे, प्रा. प्रकाश तडस,सुरेशराव मेहरे आदींनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित ” विद्रोही महात्मा ” व प्रसिद्ध साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बुंदेले लिखित “अभंग तरंग ” हा परिवर्तनवादी काव्यसंग्रह भेट देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सर्वांना प्रेरणादायी ठरलेल्या गझल नवाज पं. भीमराव पांचाळे नागरी सत्कार समारंभाच्या आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे .