ब्रेकिंगमहाराष्ट्र
न्यायालयाच्या आवारात आरडाओरड करणाऱ्या मद्यपीवर तुळजापूर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आवारात आरडाओरड करणाऱ्या मद्यपीवर तुळजापूर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
न्यायालयाच्या आवारात आरडाओरड करणाऱ्या मद्यपीवर तुळजापूर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी येथील राजेंद्र महादेव मोरे हा मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून गोंधळ घालत पडल्याचे तुळजापूर पोलीसांच्या निदर्शनास आले. यावरून पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून मोरे याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 85 ( 1 ) अंतर्गत गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी कळविले आहे.