मराठा वनवास यात्रा’ ही जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात दि. ६ जून रोजी मंत्रालयावर धडककणार

‘मराठा वनवास यात्रा’ ही जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात दि. ६ जून रोजी मंत्रालयावर धडककणार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
‘मराठा वनवास यात्रा’ ही जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबईत पोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत.चळवळीतील अग्रगण्य शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. श्री तुळजाभवानी मातेच्या महाद्वार मंदिरासमोर पोवाड्यांचा कार्यक्रम घेण्यात आला.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आता आक्रम झाले आहेत. मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर ते मंत्रालय अशी वनवास यात्रा दि.६ में रोजी या वनवास यात्रेला तुळजापुरातून प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्तात प्रारंभ झाला
मराठा समाजाच्या ओबीसीत समावेश करून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. आई तुळजाभवनीचा जागर करून तुळजापूरातून या वनवास यात्रेला प्रारंभ झाला. मराठा समाज वनवास यात्रा काढण्यात आली. यावेळी यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणाबाजी करत आरक्षण द्या अन्यथा खूर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी केली. वनवास यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता येत्या ६ जून रोजी ही वनवास यात्रा मंत्रालयावर धडकणार
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा वनवास यात्रेस विरोध करीत वनवास यात्रा उधळून लावण्याचा प्रत्येन केला मात्र पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची बाचाबाची होऊ दिली नाही.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यानी बोलताना म्हणाले आम्हाला आरक्षण तर हवे आहेत पण कोणत्या दलाला मार्फत नको आहे. अशा निषेध नोंदवीला.