
विविध सामाजिक उपक्रमांनी मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा वाढदिवस साजरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
विकास आणि जनसेवा यांची सांगड घालणारा नागराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे, ते माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचा वाढदिवस आमदार राणाजगजीतसिंह पाटील व युवा नेते विनोद पिटू भैय्या गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांनी साजर करण्यात आला
यामध्ये सकाळी महाद्वार समोर भाविकांना मिठाई व अन्नदान करण्यात आले, तसेच यावेळी दिपक संघ चौकात मित्र परिवाराच्या वतीने पाणपोई ची सोय करण्यात आली, त्यानंतर श्री तुळजाभवानी अनाथाश्रम, तुळजापूर शहरातील महंत मठ व उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर या ठिकाणी कुलर भेट देण्यात आले,
यावेळी सचिन रोचकरी यांच्या सह गोकुळ तात्या शिंदे, बाळासाहेब भाऊ शिंदे,शांताराम पेंदे, आनंद कंदले, शिवाजीराव बोधले,सुहास सळुंके,नानासाहेब लोंढे,अभिजित कदम,नानासाहेब डोंगरे,राजेश्वर कदम,राम चोपदार, दिनेश बागल,भारत सोनवणे,सचिन कदम, अप्पा पवार,समर्थ पैलवान, रोहित चव्हाण,सर्व मित्र परिवार उपस्थित होते.