न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वागदरीत भव्य मिरवणूकीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता

वागदरीत भव्य मिरवणूकीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता

वागदरी /न्यूज सिक्सर
वागदरी ता.तुळजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाची सांगता भव्य मिरवणूकीने करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी ता.तुळजापूर च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी सेवानिव्रत मुख्याध्यापक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी उपसरपंच बालाजी बिराजदार,सत्यशील सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वामन धाडवे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भिमगीत गायनाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संघमित्रा कलापथ हाडपसर पुणे, राजरत्न गायन पार्टी दहिटणा (ता.तुळजापूर) यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर आधारित भिमगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
तर रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, माजी सरपंच तथा पंचशील बुद्ध विहार कमिटी वागदरीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे,जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अंकुल वाघमारे, उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते विश्वारत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली. या मिरवणूकीत सिध्दार्थ कला व क्रीडा मंडळ येडोळा,समता संघर्ष ग्रुप आष्टा (कासार),डीएसके थोरला वाडा लेझीम ग्रुप गुजनूर, बी.आर.लेझिम संघ वागदरी आदी लेझीम पथकाने उत्कृष्ट लेझीमचे सादरीकरण केले. जयंती उत्सवा निमित्ताने सेवानिवृत्त पोलिस हावलदार संदिपान वाघमारे यांनी भोजनदान दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अंकुल वाघमारे,सुर्यकांत वाघमारे, हाणमंत वाघमारे, बाबासाहेब वाघमारे,चंद्रकांत वाघमारे, सहादेव वाघमारे, उत्तम झेंडारे,अनिल वाघमारे,वाल्मिक वाघमारे, सह बि.आर.ग्रुपचे सर्व युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सरपंच तेजाबाई मिटकर, ग्रा.प.सदस्य गुनाबाई बनसोडे, प्रमोद सोमवसे, महादेव वाघमारे, दिपक वाघमारे, परमेश्वर वाघमारे, विजय वाघमारे,गौतम वाघमारे, राजकुमार वाघमारे,भारत वाघमारे,आण्णासाहेब वाघमारे, प्रकाश वाघमारे,अंबादास झेंडारे,पंचशीला कांबळे-वाघमारे, माजी उपसरपंच कविता गायकवाड,मुक्ताबाई वाघमारे,गीताबाई झेंडारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे