महाराष्ट्र
नळदुर्ग वागदरी व परिसरास अवकाळी पावसाने झोडपले : अंब्याची फळ झाडे कोलमडून मोठे नुकसान

नळदुर्ग वागदरी व परिसरास अवकाळी पावसाने झोडपले : अंब्याची फळ झाडे कोलमडून मोठे नुकसान
वागदरी/न्यूज सिक्सर
दि.२८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ठिक ५.०० ते ७.३० वा.दरम्यान तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, वागदरी, येडोळा व परिसरात वादळी वारा,विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील अंब्याची झाडे कोलमडून पडल्याने अंबा फळांचे मोठे नुकसान झाले असून गावातील अनेक घरावरील पत्रे उडून संसार उपयोगी वस्तू ,अन्न,धान्याचे नुकसान झाले आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पत्र्याचे शेड वादळी वाऱ्यात उडून गेले तर रब्बी हंगामातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
तरी शासनाने वादळी वाऱ्यासह अवेळी आलेल्या पावसाने फळझाडांचे व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना नुकसानभरपाई द्यावी तसेच पडझड झालेल्या घराच्या कुटुंबानाही आर्थिक मदत द्यावी असी मागणी होत आहे.