तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथे चक्री व मटका, व्हिडीओ गेमच्यानावाखाली जुगाराचे साहित्यासह एकुण 188180/-रु जप्त
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथे चक्री व मटका, व्हिडीओ गेमच्यानावाखाली जुगाराचे साहित्यासह एकुण 188180/-रु जप्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र तुळजापूर पुण्य पावण नगरीत जिल्हापोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक जुन रोजी एम. रमेश सहा पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब यांना पोलीस ठाणे तुळजापुर शहारातील जुने बसस्थान तुळजापुर येथे गोलाई चौक येथील चक्री व मटका, व्हिडीओ गेम मशीन नावाचे जुगाराचे चालु असल्याची गोपनीय माहिती मिळालेल्या ठिकाणी कळंब उपविभागाचे पथक यांनी छापा मारले ते खालील प्रमाणे
1) जोतीबा हॉटेलच्या पाठीमागे पत्रयाचे रूममध्ये व्हिडीओ गेम नावाचे जुगार खेळत खेळवित असता दोन इसम मिळुन आले त्याच्या कडे मुददेमाल i) रोख रक्कम 2600 रु असे ii) मुददेमाल 23000/- रु असे एकुण 25600/-रु
2) रंगराज लॉज पाठीमागे पत्रयाचे रुममध्ये चक्री नावाचे जुगार खेळत खेळवित असता तीन इसम मिळुन आले त्याच्याकडे मुददेमाल i) रोख रक्कम 39550/- रू ii) मुददेमाल 25000/- रु असे एकुण 64550/- रु
3) जुने बसस्थानक समोर कोकाटे पान शॉप व कॅटीन मध्ये कल्याण मटका नावाचे जुगार खेळत एक इसम मिळुन आले त्याच्याकडे मुददेमाल ) रोख रक्कम 4240 /- रु ii) मुददेमाल 10000/- रु असा एकुण 14240/-रु
4) जुने बसस्थानक समोर जगदंबा ट्रव्हल्स पत्रयाचे रुममध्ये चक्री नावाचे जुगार खेळत चार इसम मिळुन आले त्याच्याकडे मुददेमाल i) रोख रक्कम 20790/- ii) मुददेमाल 53000/- रु असे एकुण 83790/- रु
वरील चार ठिकाणी एकुण रोख रक्कम 67180/-रु व मुददेमाल 121000/- रु असा एकुण 188180/-रु व 10 आरोपी विरुध्द कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे पोलीस ठाणे तुळजापुर येथे 04 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी एम. रमेश सहा पोलीस अधीक्षक उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री ससाणे , पोउपनि श्री पुजरवाड, पोना सादीक शेख, पोकॉ नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, पोना पोकॉ शहारुकखॉ पठाण असे सर्वांनी सहभाग घेवुन कामगिरी केलेली आहे.