समाजाच्या एकी साठी!… छोटासा प्रयत्न – शिवसेना प्रवक्ता योगेश केदार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

समाजाच्या एकी साठी!… छोटासा प्रयत्न – शिवसेना प्रवक्ता योगेश केदार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
रात्री उशिरा सन्माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्यासोबत अंतरवली येथे चर्चा. बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्या आणि मनोज दादांच्या मध्ये विवाद सुरू आहेत अन् त्यामुळे समाजात फूट. अश्या बातम्या दोन तीन दिवसांपासून दाखवल्या जात होत्या. त्याचा थोडाबहुत का असेना परिणाम मराठा समाजात होत होता. त्यामुळे आधी राजाभाऊ यांच्याशी चर्चा केली. आपण मनोज दादांच्या विरोधात बोलू नये अशी विनंती केली. त्यांनी त्याला सहमती दिली. त्यानंतर मनोज दादा जरंगे पाटील यांच्याशी भेटून त्यांनाही विनंती केली.
दोघांच्या मनात एकमेकांच्या विषयी सकारात्मक भावनाच दिसून आल्या.
मनोज दादांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा यशस्वी लढा सुरू आहे. आपल्याला ते नेतृत्व जपावे लागणार आहे. त्याशिवाय विस्थापित मराठ्यांचा आवाज बुलंद होणार नाही. वेळोवेळी जेंव्हा आवश्यकता पडेल तेंव्हा पक्षाचा विचार न करता मी दादांची आणि चळवळीची भक्कम बाजू घेत आलोय.
हैदराबाद गॅझेटीयर लागू झाले तर मराठवाड्यातील शेकडो वर्षे अन्याय सहन करणाऱ्या मराठ्यांना न्याय मिळेल. असे मला वाटते. त्याची अंमलबजावणी 17 सप्टेंबर पर्यंत करावी अशी विनंती मी शासनाला लेखी निवेदन देऊन कळवली आहे.
आमदार राजाभाऊ यांनी देखील विशेष अधिवेशन बोलावण्याची स्तुत्य मागणी लावून धरली आहे. एकदा होऊन जाऊ द्या ‘दूध का दूध अन् पाणी का पाणी.’ त्यातून प्रत्येक पक्षाची अधिकृत भूमिका समाजाला समजेल. अन् संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर अधेवशन उपयोगाचेच ठरेल. त्यामुळे समाजाने देखील प्रत्येक आमदाराला जाब विचारावा.
काल माझ्यासोबत बार्शी चे वकील adv गणेश जी हांडे उपस्थित होते. त्यांनीही काही महत्वाच्या गोष्टी कानी घातल्या. तसेच महेश केदार, नंदू जाधव, विशाल लोमटे उपस्थित होते.