डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवा-डॉ. सुरेश वाघमारे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवा-डॉ. सुरेश वाघमारे
वागदरी /न्यूज सिक्सर
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर निष्ठा असलेली व्यक्ती कोणालाही घाबरत नसून आपल्याला आपल्या सर्वांगीन विकास साधून स्वाभिमानाने स्वावलंबी जिवन जगायचे असेल तर बहुजनानी भारतीय संविधानावर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर निष्ठा ठेवूनच जिवन व्यतीत करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन सम्यक समाज संघटनेचे संस्थापक तथा साहित्यिक विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे (लातूर) यांनी गुजनूर ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी गुजनूर ता.तुळजापूरच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने व्याख्यान, बक्षिस वितरण व भिमगीत गायण असा विविध कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक सत्यवान वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुरेश वाघमारे हे बोलत होते.
याप्रसंगी प्रा.डी.डी.मस्के, मारुती बनसोडे, भैरवनाथ कानडे,एस.के.गायकवाड यांची ही मार्गदर्शन पर भाषणे झाली.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून सह वाद्य भव्य मिरवणूक काढून जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
यासर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.जयभीम वाघमारे यांनी केले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे विश्वास पांडागळे,विलास कदम,समता सैनिक दलाचे अनिल सरपते,सरपंच फुलचंद वाघमारे,गौतम वाघमारे, प्रभाकर वाघमारे,कांचन वाघमारे,जयंती उत्सव अध्यक्ष लहू वाघमारे,उपाध्यक्ष आकाश वाघमारे, सचिव अमर वाघमारे, धनाजी वाघमरे,महेश वाघमारे,कांताबाई वाघमारे,मल्हारी वाघमारे सह ग्रामस्थ उपस्थित होते.