कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व देवराज मित्र मंडळ प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रचार शुभारंभ !
उत्पन्न बाजार समितीमध्ये देवराज मित्र मंडळ व शिंदे गटाची एन्ट्री होणार !

कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व देवराज मित्र मंडळ प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनल प्रचार शुभारंभ !
उत्पन्न बाजार समितीमध्ये देवराज मित्र मंडळ व शिंदे गटाची एन्ट्री होणार !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गुरूवार पर्यंत (दि.२०) ८९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ५२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपा, महाविकास आघाडी व शिवसेना व देवराज मित्र मंडळ यांच्या वतीने दिग्गज उमेदवारांना उमेदवारी दिल्याने प्रथमच अंत्यत अटीतटीची लढत होणार.कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व देवराज मित्र मंडळ प्रणित शेतकरी विकास आघाडी पॅनल उभा केल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता शिंदे गट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उतरल्यामुळे व तसेच तुळजापूर तालुक्यामध्ये वर्चस्व असलेले देवानंद रोचकरी हे शिवसेनेसोबत युती करून आपला पॅनल उभा केल्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवराज मित्र मंडळ व शिंदे गटाची एन्ट्री होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, अरळी(बु), अपसिंगा, सांगवी,कांक्रबा,सलगरा, काटी, सावरगाव, तामलवाडी, काटागाव,इटकळ, अणदूर,जळकोट, नंदगाव या गावात गट आणि गणातील सर्व गावांच्या ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य यांच्या सह ग्रामस्थांसोबत बैठक पार पडल्या, यावेळी ग्रामस्थ व देवराज मित्र मंडळ व शिंदे गटाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.