न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी 25 एप्रिलपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी 25 एप्रिलपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

•राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर होणार स्पर्धा

•राज्यस्तरावर प्रथम बक्षीस 1 कोटी, तर 50 लाख रुपयांचे द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस 30

   लाख

•जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस 50 लाख रुपये, 30 लाख रुपयांचे द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस 20 लाख

 उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
अटल भूजल योजनेंतर्गत समाविष्ट 55 गावांमध्ये भूजल व्यवस्था शाश्वत राखण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, गावा-गावांमध्ये सदृढ स्पर्धा निर्माण होण्यासाठी आणि लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हे ब्रीद साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत “भूजल समृध्द ग्राम स्पर्धेचे”, आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहन निधी, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांसाठी ही स्पर्धा राबविण्यात येत असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी दिली. तसेच या स्पर्धेसाठी 25 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक असून यामध्ये प्रामुख्याने नगदी पिकांच्या सिंचनाकरिता भूजलाचा उपसा अधिक होत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहेत. पूनर्भरणापेक्षा अधिक भूजल उपसा विंधन विहिरीद्वारे केल्याने भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गूणवत्तेवर परिणाम होत आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन, अधिकाधीक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थ सहाय्यीत अटल भूजल योजना जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येत आहे.

अटल भूजल योजनेचे मुख्य ब्रीद लोकसहभागातून ‘भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत – भूजल समृध्द ग्राम स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत दरवर्षी राज्य स्तरावर प्रथम बक्षीस 1 कोटी रुपये, द्वितीय बक्षीस 50 लाख रुपये आणि

तृतीय बक्षीस 30 लाख रुपयांचे असणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस 50 लाख रुपये, द्वितीय बक्षीस 30 लाख रुपये आणि तृतीय बक्षीस 20 लाख रुपये राहील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गावांची निवड ही दिलेल्या निकषानुसार तालुका, जिल्हा व राज्य स्तरीय

निवड समितीमार्फत गावांचे मुल्यांकन करून होईल. अटल भूजल योजनेमध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेणेसाठी त्यांचेकडील पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत ठराव करून ठरावाच्या प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, धाराशिव यांचेकडे 25 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन  एस बी गायकवाड यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे