
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील खेड शिवारातील लोकमंगल कारखान्याच्या समोर बालकल्या -तुळजापूर ही एसटी महामंडळांच्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी विद्यार्थ्यांसह ६५ प्रवासी बचावले. हि घटना ८:३० ते ८: ४५ वाजण्याच्यासुमारास खेड शिवारात लोकमंगल कारखान्याच्याजवळ (ता.लोहारा,जि. धाराशिव ) येथे ही घटना घडली.
बसवकल्याण- तुळजापूर ही बस (बस क्रमांक एम एच २० बी एल २०९२)बसवकल्याणकडून तुळजापूरकडे जात होती. माकणी, खेड येथील प्रवाशांची चढ उतार झाल्यानंतर लोकमंगल कारखान्याजवळ प्रवासी उतरण्यासाठी चालक एम. व्ही. घंटे यांनी बस थांबवली.यावेळी बसच्या इंजिनने अचानक पेट घेतली. यावेळी बस मध्ये प्रवासी ६५ प्रवासी होते.कर्तव्यावर असलेले चालक एम. व्ही घंटे व वाहक बी एस. गोरे यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. बस पेटलेली पाहून लोकमंगल कारखान्याच्या एका कर्मचाऱ्याने लोकमंगल कारखान्याच्या अग्नीशामक गाडीला फोन करून बोलावून घेतले. व आग आटोक्यात आणली.
यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे व पोलीस कर्मचारी कांतु राठोड यांनी कांहीं मिनिटांत घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहीती घेतली