
लोहारा(प्रतिनिधी)
श्रीगिरे हॉस्पिटल येथे लोहारा तालुका धनगर समाजाच्यावतीने नूतन तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांचा सत्कार मा.उपसरपंच व्यंकटराव घोडके यांच्या शुुभ हस्ते शाल,श्रीफळ, फेटा देऊन करण्यात आला.तसेच नागुर येथील सुनील इंद्रजीत वरवटे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत केंद्र शासनाच्या कृषी अधिकारी वर्ग 1( शास्त्रज्ञ) या पदाला गवसणी घातली. त्यामुळे त्यांचा सत्कार तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,फेटा देऊन करण्यात आला.
आयुष्यात शिक्षण घेतांना पाल्यानी चिकाटी आणि जिद्द निर्माण करावी जे ध्येय आहे ते पुर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला यश नक्की मिळते आशा वेळी आई वडील मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू देत नाहीत. त्यामुळे मुलांनी ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे कारण मी पण एका शिक्षकाचा मुलगा चार एकर शेती दोन भाऊ आमचे शिक्षण, वडिलांचा आठवा वेतन आयोग प्रमाणे पगार तुटपुंज पगार पण चिकाटी च्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन तहसीलदार तर माझा भाऊ सेल्स टॅक्स इन्सपेक्टर झाले तरी जिद्द सोडली नाही पाहिजे असे मत तहसीलदार रणजितसिह कोळेकर यांनी धनगर समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी केले.
यावेळी मंडळ अधिकारी जगदीश लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेेच सत्कारमुर्ती तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर आणि सुनील वरवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.पं.स.सदस्य सुधीर घोडके,दत्तात्रय गाडेकर,डॉ.सौ.रूपाली श्रीगिरे,उमेश देवकर,दगडू तिगाडे,पंडित बारगळ,राजेंद्र बंडगर,उत्तम पाटील,प्रेम लांडगे,प्रशांत थोरात,इंद्रजीत वरवटे,योगेश गाडेकर,अनिल घोडके,अक्षय विरोधे,जयसिंग बंडगर,पत्रकार इकबाल मुल्ला गणेश खबोले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पांढरे तर आभार प्रदर्शन सुरेश वाघमोडे यांनी केले..